००० फुटबॉलची आरती ००० Poem by Chaitanya Kanherikar

००० फुटबॉलची आरती ०००

००० ०००आरती फुटबॉला ००० ०००

००द्वारा-चैतन्य कन्हेरीकर

००० आरती फुटबॉला, प्रेमे ओवाळू तुजला,
००० कुरवाळू तुजला, आरती फुटबॉला ०००! ! धृ! !
००० उष्णोदके नाहविले, शुद्धोदके करविले
००० दुर्वांकुर अरपिले, पुष्पगंधानी पूजले
००० सर्वलंकारारथे तुज, हळदी कुंकवानी रेखिले
००० पंचामृत नैवेद्ये, धुप दीप दावियले
००० दिवे भावे ओवाळिले, प्रेमे भावे ओवाळीतो, तुज! ! १! !
००० आरती फुटबॉला ०००
००० लत्ता प्रहार तू खाशी, ठो दे ठो दे ठोदेशी,
००० ना कपाळा तू मोक्षी, चिखला पाण्यात लोळशी
००० तरी नातुरे शिंकशी, जरी घरात शिरशी,
००० तावदानास भेदशी, शिव्या भलत्या तू खाशी, तुज! ! २! !
००० आरती फुटबॉला ०००
००० नवसाला पाव, खर्या भक्तीला तू पाव
००० तुझ्या भक्ताला तू पाव, तुझा महिमा आठव
००० आमच्या संघास जिंकव, बेटिंगा रिचव
००० मग माग जे हवं, पुरविन हट्ट तुझे सर्व, तुज! ! ३! !
००० आरती फुटबॉला ०००
००० एके दिवशी रुसला, काटा अंगात घुसला
००० भगताकडे नेला, कोंबडा-बकारही दिला....
००० जोड चिकटविला, चांभारे शिवला, तरी नातू रे भरला
००० किती किती फुगवला, गेला गेला जीव गेला, तुज! ! ४! !
००० आरती फुटबॉला ०००! ! धृ! ! ००० प्रेमे ओवाळू ०००
००० - चैतन्य कन्हेरीकर

कर्जत(रायगड) १३जुलै२००४

Tuesday, December 27, 2016
Topic(s) of this poem: football
POET'S NOTES ABOUT THE POEM
एक अतिशयोक्तीपूर्ण विनोदी काव्य! काव्या द्वारे विनोद
निर्मिती हाच निर्मळ हेतू!
COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success