००० इंद्रधनू पंखी पतंग ०००
००द्वारा-चैतन्य कन्हेरीकर
००मदन मिठीच्या बाहू पाशात तू
००सुख स्वप्नीचे स्वप्न तरंग
००उमलती सुगंधी कळी तू
००उलगडता रेशीमबंध उजळले सप्तरंग ०००
००राग गाली येता तव रक्त चंदन लाली
००की तांबूस लाल बुंद नारंग जास्वंद ल्याली
००रंगात आपल्याच दंग ०००
००पितांबर पिवळे उपरणे लपेटून सर्वांगी
००बहरली शेवंती धुंदीत पिवळ्या अनुरागी
००हळदी क्षितिजी मावळतीचे चंग ०००
००किण किण पाचू चुड्यांचे स्पर्श गारठलेले
००हिरव्या गालीची छुमकती पैंजण पाऊले
००ओल्या दवात शहारले कंपित सर्व अंग ०००
००निळ्या नितळ नभांगणी डोंगर पाणी निळे
००न्याहाळती नील कमळे नीलाक्षी चंचल डोळे
००डोळ्यात पाहिले मी प्रतिबिंबाचे अंतरंग ०००
००स्फटिक शुभ्र फेसाळूनी उसळती ओसंडती झरे
००पांघरोनी दव धुक्याचे केसांवरी तुरे
००लज्जेत ओढणीच्या रुपेरी क्षण संग ०००
००पाऊले चालता जांभा दगड वाटा जांभळ्या
००जांभळीच्या वृक्षाखाली उलगडल्या ओठकळ्या
००अमृतरस पिऊनी परतला सप्तरंगी पतंग ०००
००प्रणय मिठीत येता प्रिये कमलबाहूत तू
००रतिसुख मिलनाचा चढता रंग
००उमलती सुगंधी कळी तू
००उलगडता रेशीमबंध दरवळे कस्तुरीगंधितरंग ०००
००-चैतन्य कन्हेरीकर
००कर्जत(रायगड) ११ऑगस्ट२००६
This poem has not been translated into any other language yet.
I would like to translate this poem