०००चांदण्या लुकलुकती ००० Poem by Chaitanya Kanherikar

०००चांदण्या लुकलुकती ०००

०००चांदण्या लुकलुकती ०००

००द्वारा-चैतन्य कन्हेरीकर

००चांदण्या लुकलुकती पाण्यावर मंद मंद००
००गर्द आमराईचा दाटला गंध कुंद कुंद

००पहाट गारवारा झोंबे सर्व अंगाला ०००
वसने दवात चिंब जीवही शहारला

००धुके पिंजोनी पांगोनी लागले ओसरू ०००
००सावरी कापूस अंगी सर्वांगी पांघरू

००पाखरे झाडती पंख ओले पुसतात ०००
००चिंब भिजल्या रानवेली ओल्या गारव्यात

००शीतल चंद्र बिंब आले माथ्यावर ०००
००प्रिया ग माझी निजे खांद्यावर

००स्मित खळी भरोनी दव अमृताचे मोती ०००
००पापण्या मिटोनी अधीर ओठांनी मकरंद शोशती

००चांदण्या लुकलुकती पाण्यावर मंद मंद००
००गर्द आमराईचा दाटला गंध कुंद कुंद
००-चैतन्य कन्हेरीकर

००कर्जत(रायगड) ४जुलै१९८६

Saturday, December 24, 2016
Topic(s) of this poem: fog
POET'S NOTES ABOUT THE POEM
पौर्णिमेच्या उत्तर रात्रीचा प्रहर, नदी किनारा,
गुलाबी थंडी, आणि धुक्यात हरवलेली
प्रणयातुर ती दोघें ०००
COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success