०००कोमेजल्या स्मृती००० Poem by Chaitanya Kanherikar

०००कोमेजल्या स्मृती०००

०००कोमेजल्या स्मृती०००

००द्वारा-चैतन्य कन्हेरीकर

००वेली सुगंधी वाहती झरे
००मज आस लावूनी नेती तिथे
००संजिवनी डोळ्यांत तुझ्या
००कोमेजल्या स्मृती शोधू कुठे! ! धृ! !

००होतीस कळी गालांत खळी
००प्रेमं आवेगे घेता जवळी
००मुकं होती शब्द जिथे
००कोमेजल्या स्मृती शोधू कुठे! ! १! !

००रानं वेलींस मी पुसले
००मज प्रियेसी कुणी पाहिले
००अनिवार हुंदका एक फुटे
००कोमेजल्या स्मृती शोधू कुठे! ! २! !

००पाण कपारी उदास भासती
००शिला काळ्या भयाण हासती
००विरही हाक मारू कुठे
००कोमेजल्या स्मृती शोधू कुठे! ! ३! !
००-चैतन्य कन्हेरीकर

००कर्जत(रायगड) १३नोव्हेंबर१९८५

Sunday, January 8, 2017
Topic(s) of this poem: loneliness
POET'S NOTES ABOUT THE POEM
*विरहाने व्याकूळ झालेला तो००अन, त्याचे हे
हृद्य रुदन कवितेतून व्यक्त झाले आहे ०००
COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success