००० शब्द हळवे ओले मुके ०००
००
००द्वारा: - चैतन्य कन्हेरीकर
००
००जा उडुनी पाखरांनो००
००झाली पहाट क्षितिजावरती००
००हे शब्द ओले मुके००
००मनोमनी ओवाळती आरती००
००जा उडुनी पाखरांनो००
००घेवुनि दिव्य भरारी००
००हळवी वेदना फुटे हुंदका००
००निरोपा अंतरी उरि००! ! धृ! !
००जा उडुनी००
००
००इवल्याशा बिजांतून आली००
००रोपे तरणी ताठी००
००डौलदार वृक्ष होती००
००लाविता नदी काठी००
००ऊन पाऊस वारा सोसा००
००मधु फळे मग येती००! ! १! !
००जा उडुनी००
००
००मनं हळवे झाले००
००जरि या क्षणां पुरती००
००उज्वल भविष्य उभे००
००सारे तुम्हा पुढती००
००ठेवुनिया श्रद्धा००
००परमेश्वरा वरी००! ! २! !
००जा उडुनी००
००
००विद्यार्थी दशा००
००जणू फुलंपाखरा परि००
००मकरंद संपता एका००
००उडावे दुज्या पुष्पावरि००
००न विसरा या अभिनव००
००ज्ञान मंदिरा तरि००! ! ३! !
००जा उडुनी००
००
००नकाच विसरू तुम्ही००
००ही जुनाट खोपटी घरटी००
००मधु फळांची होता पूर्ती००
००या माघारी परति००
००ज्ञान मंदिराचे स्मरा००
००ऋण आम्हा वरती००! ! ४! !
००जा उडुनी००
००
००ज्ञान दीप लावा जगी००
००सुस्वरे आळवा मग००
००चैतन्य अनुरागी००
००क्षमा शिल प्रज्ञा अंगी००
००मोह मद मत्सर त्यागी००
००दरवळू दे ज्ञानाचा००
००सुगंध आसमंती००! ! ५! !
००जा उडुनी००
००-चैतन्य कन्हेरीकर
००
००कर्जत(रायगड) २०जानेवारी२००७
This poem has not been translated into any other language yet.
I would like to translate this poem