००० सखी श्रावणी ००० Poem by Chaitanya Kanherikar

००० सखी श्रावणी ०००

००० सखी श्रावणी ०००
००
००द्वारा: -चैतन्य कन्हेरीकर
००
००ऊन पावसाचा ऋतू००
००सखी श्रावणी सज तू००
००फुलं पानावर मोती००
००पोवळ्याचे पाचू००
००पंख फुलोनी पिसारा००
००मोर लागला गं नाचू००! ! धृ! !
००
००निळ्या अंबरी उठली००
००सात रंगांची कमान००
००रुते कवडसा केवड्याचे००
००बनी मदनाचा बाण००
००ओढणी रुपेरी००
००श्रावणीस लागे काचू००! ! १! !
००
००ऊन पावसाचा खेळ००
००संगे वारा अवखळ००
००नभा मंडपी गुंफी००
००पाखरांची कंठी माळ००
००ओल्या तुषारांचे पाचू००
००आले साचू किती वेचू००! ! २! !
००
००डोंगर गाली ओले००
००आसु ओघळले००
००झिरपुनी रुजुनि००
००उगवली रानं फुले००
००काळ्या केसांत भांगात००
००कुंकवाची लकेर खेचू००! ! ३! !
००
००फुलांतुनि उडे००
००काळा लबाडं भवरं००
००पाठ शिवणीच्या खेळी००
००फुलं पाखरे बेजारं००
००गुं गुं गाणे गुण गुणी००
००मधु गेलागं रिचू००! ! ४! !
००-चैतन्य कन्हेरीकर
००
००कर्जत(रायगड) २०जुलै२००९

Sunday, January 15, 2017
Topic(s) of this poem: rain
POET'S NOTES ABOUT THE POEM
*मनातला श्रावण फुलण्यासाठी
श्रावण मासाची वाट कशास पहावी?
मनाचा वसंत बहरण्या साठी वसंत
ऋतूची वाट का पहावी? कवी मनास
हे सारं मनोमनी अनुभवता येतं ०००
मनोविलास सारा ००
COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success