००माझी वेणुं ००० Poem by Chaitanya Kanherikar

००माझी वेणुं ०००

००माझी वेणुं ०००
००
००द्वारा: चैतन्य कन्हेरीकर
००
००वेणु पाहाते वाटं पौर्णिमेची ००
००मंद वाऱ्यात शुभ्र चांदण्यांची ००
००वेणु पाहाते वाटं पौर्णिमेची ००
००कुंद काळ्यांच्या धुंद सुगंधाची ००
००
००वेणु पाहाते वाटं पौर्णिमेची ००
००ढग पांघरल्या डोंगर रांगांची ००
००वेणु पाहाते वाटं पौर्णिमेची ००
००रानं पाखरांच्या घीर-घिरटयांची ००
००
००वेणु पाहाते जीची वाटं ००
००आली अशी पौर्णिमेची रातं ००
००कोणी कोठोनी दिली वेणुस दादं ००
००पौर्णिमेचाचं हा प्रतिसादं ००
००
००पौर्णिमेच्या राती वेणु ००
००उन्मादली निनादली ००
००सप्तसुरांच्या गंगेत ००
००सर्वांग नाहली ००
००
००वेणु पाहाते वाटं
००पौर्णिमेची ००
००पौर्णिमा पाही वाटं ००
००वेणुची ००
००-चैतन्य कन्हेरीकर
००
कर्जत(रायगड) २५फेब्रुवारी१९९२

Thursday, January 26, 2017
Topic(s) of this poem: love and friendship
POET'S NOTES ABOUT THE POEM
पौर्णिमेच्या रात्री बासरीची मधुर धून
कानी पडता, सुखं शब्दात काय
सांगावे! आणि ही धून आपण
स्वतः जर वाजवत असू तर ०००
COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success