रानफुला Poem by Chaitanya Kanherikar

रानफुला

कवी: चैतन्य विनायक कन्हेरीकर. फुला उमलसी रान वाटेवरी l. तुझं ठेवू पुष्पा कसा देव घरी llध्रुll. वात झोक्यावरी तव सवारी l. आलास तू परसदारी l. ओंजळीत विसावा अति आनंद उरी ll१ll. मधुराणी परी गुलाब मोगरा l. त्यात हासरा तुझा चेहरा l. पांघरून आला धुक्या वरी ll२ll. कवी: चैतन्य विनायक कन्हेरीकर. दिनांक: सोम१६जून२०२५.

COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success