कवी: चैतन्य विनायक कन्हेरीकर. विरळ विरळ काळया कुट्ट तेज पुंज छटा.०० गिळंकृत सागराच्या खवळल्या लाटा.००० तेजो निधी तप्त गोल कलला सर्वनाशाकडे.०० प्रचंड स्फोटाने फुटला तो झाले वीर तुकडे.०० झगमगाठ लखलखात वायूगोलांची बरसात.०० औट घटीकेची दिवाळी उजळली ब्रम्हांडात.००० संपला एक एक ग्रह गोल.००० त्या एका क्षणी पृथ्वीचा ही गेला तोल.०० घरंगळली अनंतात लुप्त झाली अति खोल.०० मंद अंधुक काळसर निळसर उरला संधी प्रकाश.०००० शांत शितल अवघे उरले ब्रम्हांडी अवकाश ००० कवी: चैतन्य विनायक कन्हेरीकर. दिनांक १५मे१९८६.
This poem has not been translated into any other language yet.
I would like to translate this poem