०००० अनंत यात्री तुका ००० Poem by Chaitanya Kanherikar

०००० अनंत यात्री तुका ०००

०००० अनंत यात्री तुका ०००

००द्वारा-चैतन्य कन्हेरीकर

००हरि कीर्तनी सदा दंग ०००!
००तुका हरवोनिया सकलांग ०००! !
००देह स्वयेची होऊनि अभंग ०००! !
००तुका एकरूपे जाहला पांडुरंग ०००! ! १! !

००इंद्रायणी काठी फुलवी भक्तीचा मळा ०००!
००संत सज्जनांचा जमवुनि कुंभ-मेळा ०००! !
००'हरि मुखे म्हणा' करि गजर सकळा ०००!
००टाळ मृदुंग कीर्तनी रमला देहू जन सगळा ०००! ! २! !

००न करू कोणे एक उणी दुणी ०००!
००भजनी न करू आळस कोणी ०००! !
००पांडुरंग सर्वे सर्वां तरे जाणी ०००!
००तुका म्हणे हिच श्रेष्ठ अभंग वाणी ०००! ! ३! !

००ब्रह्मवृंद रामेश्वर भट्ट निपजले द्वाड ०००!
००तुका करवि बुडविले अभंग बाड ०००! !
००तेरा दिनराती जपे माऊली जिवापाड ०००!
००पवित्र अभंगांचि इंद्रायणी राखिली चाड ०००! ! ४! !

००मम्बाजि पळाला करूनि कांगावा ०००!
००'चुकला रामेश्वर भट्ट हा' मज अनुग्रह द्यावा ०००! !
००वेदो ब्राह्मण तुम्ही असा पायी न लागावा ०००!
००आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा राम राम घ्यावा ०००! ! ५! !

००इंद्रायणी काठी उतरे पुष्पक विमान सवारी ०००!
००'चल अवले' जाऊ पांडुरंग विठोबाचे घरी ०००! !
००धनि खूप काम अडले बाकी घरी, म्हणोनि गेली माघारी ०००!
००तुका निघे सदेह वैकुंठासी जप करी ०००! ! ६! !

००००राम कृष्ण हरि! ००००पांडुरंग हरि!
००००विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल००००! !
००००-चैतन्य कन्हेरीकर

कर्जत(रायगड) १०सप्टेंबर२०१०

०००० अनंत यात्री तुका ०००
POET'S NOTES ABOUT THE POEM
तुकाराम महाराज सदेह वैकुंठास गेले अशी आमची धारणा आहे.
जरि यास शास्त्राचा आधार नाही.कदाचित उद्या मिळेल.जरि हा
आशावाद असला तरी, त्याचे उत्तर भविष्यात सापडेल! ! !
COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success