अवचित्य महिला दिनाचे Poem by Chaitanya Kanherikar

अवचित्य महिला दिनाचे

कवी: चैतन्य विनायक कन्हेरीकर. अवचित्य महिला दिनाचे साधून का उधळीत मुक्ता फळे l. स्त्री स्वातंत्र्य मुक्ती आरक्षण संरक्षणाची खोटी मृगजळे llध्रुll. जरी झेप घेसी चंद्र मंगळावरी l कुठे जाळीती तुझा आरोप करून बंद दारी l. देवदासी कधी तू देवाची मुरळे ll१ll. अजुनी बुरख्यात लपविसी देह चंद्र मुख तुझे l किती सहशील अत्याचार दडपणाचे ओझे l तलाक त्रिवार बोलून उखडतील तुजला समजून बांडगुळे ll२ll. शल्यचिकित्सा जरी करसी देऊनी एनएसथेटेशिया भूल l. खेडोपाडी नासुटते तुज अजुनी चूल नी मूल l. अजूनही गांजलेले तू मागासलेली खुळेll ३ll. असंतुलित स्त्री-पुरुष जन्म मृत्यू-दर उपजते l वैरीण होते माय तुझी तुझ जन्मा आधी मारते l अजून निष्पाप असाह्य तू पुरुषी वर्चस्वामुळे ll४ll. टपली गिधाडे सभोवती नजरा चघळून पाहे l किती लाचार अगतिक तू जरी झगडू पाहे l. अजूनही होतो सौदा तुझा लावून बोली बाळे.ll५ll. कवी: चैतन्य विनायक कन्हेरीकर. दिनांक: १३मार्च२०१२

COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success