कवी: चैतन्य विनायक कन्हेरीकर. घेतले रानफुलास उचलून रान वाटेवरी चालताना lनसे त्यास गंध रूप जरी अंगभर काटे असताना l अनेक रानफुले जरी वाटेवरी होती कळवळा मज त्याच फुलाचा का आला l नकळत पडला पाय कुणाचा मृदु पराग कुस्करला l कण्हत असावे फुल जरी हे अज्ञाती हुंदका उमटला l परडीत ठेवले त्यासी उचलून l सुखावले फुल परडीच्या पिंजऱ्यात आतून l पण होता स्वच्छंद त्या वाटेवरती आणि रानाचा सहवास l परडीत होती घुसमट आणि एकांत कारावास l मुक्त जिवाचा आनंदच न्यारा l आता ते हिरमुसले जीव कावरा बावरा l वाटेवरल्या फुलांस वाटे हेवा या फुलाचा l आम्हास ना कोणी उचलून घेती व्यर्थ आलो जन्मी रानफुलाच्या l परडी तले फुल रुसले मजवरी, का उचलून घेतले तू मजला l होतो सुखात वाटेवरी त्या नेऊन सोड मजला l खरंच चुकलो का मी देऊनी यास जीवनदान l वाटेवरी वाट पाहे त्याची वृक्ष वेली फुल पानं पान l त्या वाटेवरी त्याच ठिकाणी सोडले मी त्यास l मागे वळूनी न पाहता निघालो सोडुनी माया मोह पाश l रान वाटेवरी कितीदा विव्हळ्ती रानफुले. तिथेच सुखाचे जीवन त्यांचे मनास समजावीले l क्षणभंगुर जीवन त्यांचे दिस भरात कोमजते l आस जीवाला लावूनी जाते मन का हुरहुरते l. कवी: चैतन्य विनायक कन्हेरीकर. दि.९जुलै२५
This poem has not been translated into any other language yet.
I would like to translate this poem