कवी: चैतन्य विनायक कन्हेरीकर. साज शृंगार लेउनी प्रिये दाटलीस ग मनात l. स्वप्न पहाटे रम्य उतरले वास्तवात l. दूर दिसलीस तू मुख लपविलेस तू l. स्वैर केसांत कुंद कळ्या खोविल्यास तू l छुमकत्या पैंजण पावलात l. गोड खळ्या गालात l. आज ये ना ये ना सखे एकांतात l. हळुवार तालात हसून गोड गालात l. पापणी लवते न तोच येई बाहू पाषात l. कवी: चैतन्य विनायक कन्हेरीकर. दिनांक: १३ऑगस्ट १९८६.
This poem has not been translated into any other language yet.
I would like to translate this poem