संभव मला आज रात्रमानी रचु शकतो व्याकुळ ओळी Poem by Sameer Khasnis

संभव मला आज रात्रमानी रचु शकतो व्याकुळ ओळी

संभव मला आज रात्रमानी रचु शकतो व्याकुळ ओळी

दाखल्यासाठी, मांडु शकतो तृतीय प्रहरी ह्या तारका

चमकत दिसे नील, करून स्पंदने कंप दुरवर तारांगणात'.

रात्रीच्या समयी करी भ्रमंती गात गाणें गगनी

संभव मला आज रात्रमानी रचु शकतो व्याकुळ ओळी

ती होती प्रेयसी माझी कधीतरी, तिची प्रित मजवरी कधीतरी

अशी ती सोमरात्र घेईन बाहुपाशात घट्ट तिचे गात्र

विस्तीर्ण भाळ गगनी घेत चुंबन पुनः पुनः माझी चारुगात्री

अनुप्रीती ती माझी कधीतरी, कधीतरी तिलाही मी प्रिय

असा कोण नाही ह्या भुमंडळी जो मनुष्यप्राणी न करी प्रशंसा ती कशी मोहक नयनी

संभव मला आज रात्रमानी रचु शकतो व्याकुळ ओळी

आभास हा ग्रास तू नाही मज सोबत, अनुभुती घेत तुझी
प्रिती तु न आता अवतीभवती

उद्विग्नता मांडत ही रात्र, करी उद्विग्नता प्रचंड तूजविन

कवन होऊन स्फुरण करत असा धावा माझ्या चैतन्याचा जैसे दवबिंदू पडे कुरणावरी

न गुंफूता माझ्या प्रेमात तिला, भिन्न होत, मी खिन्न

आसमंतात ती चंद्रीका, न समवेत माझी सारिका

एवढेच काहीसं. दुरवर गुणगुणत आहे कोणी. दुरवर कुठेतरी

तुप्त नाही चैतन्य माझं, ती नाही आज मजसोबत

सदैव शोधे दृष्टी माझी,
की यावे तिने मज समीप

हृदय माझे घेई शोध तिचा, सध्या तरी न दिसे कुठे मागमूस तिचा

त्या रात्री आच्छादन सारे वृक्ष सफेद, न कुठे दिसे अभेद

होतो आम्ही एकत्र पूर्वी, आता विभक्त व भग्न

माझं तिच्यावर आता प्रेम नाही हे निश्चित, मात्र अगोदर करत बेधुंद देत स्फुंद

ध्वनि हा माझा हुडकू पाहे तिला वारा जो करेल स्पर्श त्याचा उपध्वनि

अपरिचित कोणी तरी करील अवलंबन तिचे, जशी ती

अगोदर होती प्रेयसी अपरिचित अशी कोणाची तरी...
माझ्या चुंबनाच्या पूर्वी

तिचा सुरेलसा आवाज, तिचा आकर्षक सौंदर्याचा देह, मोहक असे डोळे

यत्किंचित देखील मी आता प्रेम करत नाही तिच्यावर, हे अगदी निश्चित,

पण असं वाटत की अजून मी करतो प्रेम तिच्यावर प्रचंड कदाचित

प्रेम करणं सोपं, विसरणे मात्र कठीण

अश्या अनेक रात्रमानी आलिंगन मी घेत माझी कुरंग, ठाव घेत माझं अंतरंग

आत्मा माझा नाही संतुष्ट, गमावलं आहे मी तिचं स्वात्म

बहुदा ही यातना तिनं मला देऊ केली आहे अखेरची,

आणि बहुदा ही कविता मी तिला देऊ करत आहे अखेरची

मुळ कविता: PABLO NERUDA *Tonight I can write the saddest lines*

रुपांतर: *समीर खासनीस*
श्री टी पी भाटिया महाविद्यालय, कांदिवली पश्चिम मुंबई

POET'S NOTES ABOUT THE POEM
One of the iconic poets of the modern world and torchbearer of young-age poetry. With an unconventional approach towards poetry
COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success