मित्रं तो मित्रच असतो००० Poem by Chaitanya Kanherikar

मित्रं तो मित्रच असतो०००

*मित्रं तो मित्रच असतो०००
*द्वारे: चैतन्य कन्हेरीकर
*मित्रं तो मित्रच असतो०००
*किती ही टाकून बोला
*पुनःपुन्हा लोचट बोलायला येतो
*मनधरणी करतो
*चूक नसताना सॉरी बोलतो
*येउ दिले तर मायेनी जवळ घेतो
*कितीही हलून काढा
*पुन्हा मांजर मेला दाराशी घुटमळतो
*मैत्रिणीला डोळ्यातून वाचतो
*कोण आहे हिला नवर्या नंतर
*आपल्या शिवाय हे तो जाणतो
*नवरा गजरा आणतो म्हणून हा
*पैसे वाचवून लाल गुलाब आणतो
*नवरा विसरतो पण हा डेरीमिल्क
*कॅटबरी आणतो
*भेटीसाठी महिने दिवस तिष्ठतो
*थंडी ऊनवारा पाऊस सारे अडथळे पार करतो
*स्वतःच्या बायकोला सांभाळून (असल्यास)
*आपली किती काळजी घेतो
*दोघींसाठी तारेवरची कसरत करतो
*संसारात व्यत्यय नको दोघांच्या,
*म्हणून सोन्याचा आहेर टाळतो
*संसाराचा रथ जरि दोन चाकांवर चालतो
*मित्रं मागे स्टेफनी बनून राहतो
*एक चाक डगमगले तरी रथ सुरळीत धावतो
*आयुष्यातील सगळ्या पोकळ्या भरून येतील
*पण मित्राची उं००हू००अशक्य! कारण
*मित्रं तो मित्रच असतो! !
**द्वारे: चैतन्य कन्हेरीकर: दिनांक१९नोव्हेंबर२०१७

Sunday, November 19, 2017
Topic(s) of this poem: friendship
POET'S NOTES ABOUT THE POEM
मैत्री महात्म्य.
COMMENTS OF THE POEM
Sunil Ghansawant 18 April 2020

कधी आठवण आली तर डोळे झाकू नकोस. जर काही तरी नाही आवडले तर सांगायला उशीर करु नकोस. कधी भेटशिल तिते एक स्माईल देउन बोलायला विसरु नकोस. कधी चुक झाल्यास माफ कर पण कधी मैत्रीची जाणीव कमी करु नकोस

0 0 Reply
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success