हँरी पॉटर Poem by Krutik Patel

हँरी पॉटर

Rating: 5.0

गोल चष्मा डोळ्यात, हाती तुझ्या छडी।
शोधायला पाठवल्या, डम्बलडोअरने घुबडी।।
आला वॉल्डमॉर माराया, तेव्हा आईने तुझ्या केले तुझे रक्षण।
बलिदान झाले सार्थक तिचे, नाही करू शकला तुझे भक्षण।।१।।

आला समोर भ्रम दर्पण, तेव्हा लोभ त्यागला।
निस्वार्थ भावानेच तुझ्या, हाती परिस लागला।।
पितृमुखी जन्म तुझा, नेत्र मात्र मातेसमान।
जन्मतःच आहे तुझ्याकडे, सर्प भाषेचे वरदान।।२।।

मगलू मरू लागले तेव्हा, भयभीत सृष्टी।
कारण शोधलेस तू, तो सर्प कालदृष्टी ।।
शोधून काढलेस तू, ते गुप्त तळघर।
मारलास महासर्प ज्याची दृष्टी प्रखर ।।३।।

जिनी जेव्हा झाली, ज्या डायरी मुळे भ्रष्ट।
मुक्त कराया तिला, तेव्हा ते हुक्रक केले नष्ट।।
बोलत्या टोपीने दिली तुला, गरूडद्वाराची तलवार।
त्याने केलास तू तेव्हा त्या कालदृष्टीचा संहार।।४।।

COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Krutik Patel

Krutik Patel

Shahada
Close
Error Success