धनाचे श्लोक Poem by Krutik Patel

धनाचे श्लोक

सर्वत्र भ्रष्टाचार जेव्हा वाढूनी गेला।
रोकन्यास तयासी नोटबंदी चा कायदा आला।।
जमा करण्यास नोटा फार गर्दी उडाली।
व्यवहारात लोकांना फार गडबड झाली।। १ ।।

भ्रष्टाचार रोखन्यासाठी जेव्हा नोटबंदी आली ।
सामान्य लोकांची फार खळबळ उडाली।।
गडबड थांबवीण्याचे फक्त एकच शास्त्र।
सर्वत्र वापरावे डिजिटल अर्थशास्त्र।।२।।

या शास्त्रात आहेत अडचणी अनेक।
करू लागले चोरटे, बँकेच्या नावावर अनेक।।
जनांनी या पासून, सदा सावध रहावे।
असे फोन आल्यास, तयास काही न सांगावे।।३।।

कोणाला कधी पीन सांगू नये।
ओटीपी सिव्हीही कधी देऊ नये।।
लॉटरी च्या लोभात कधी पडू नये।
कोणी लोभ दिल्यास बळी पडू नये।।४।।

फसवणूकी चे येथे नाही एक रूप।
आहे तयाचे कार्डींग हे आनखी स्वरूप।।
टाळण्यासाठी कोणास कार्ड कधी देऊ नये।
वापरताना कार्ड, परक्या ची मदत घेऊ नये।।५।।

तत्काळ कर्ज ॲप पासून सदा लांब रहावे।
सदा कर्ज सरळ बँकेतुनच घ्यावे।।
सदा गरज आहे तेवढेच कर्ज घ्यावे।
ज्या कामासाठी घेतले त्यातच वापरावे ।।६।।

गरजे पेक्षा अधिक सदा खर्च टाळावा।
सदा पैसा खात्री करूनच गुंतवावा।।
गुंतवणूकी आधी तज्ञाचा सल्ला घ्यावा।
अटी आणि सूचना वाचूनच निर्णय घ्यावा।।७।।

बचत खाते सदा, राष्ट्रीय बँकेतच ठेवावे।
मोठी रक्कम सदा चालू खात्यात ठेवावी।।

COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Krutik Patel

Krutik Patel

Shahada
Close
Error Success