Lबर्बरीक Poem by Krutik Patel

Lबर्बरीक

वडील त्याचे घटोत्कच, मोरवी त्याची आई।
अमोघ आहेत त्याचे बाण, ज्यांना तोड नाही।।
वय इतके कमी, होता अभिमन्यू पेक्षा लहान।
बाराव्या वर्षी अमोघ विद्या, कीर्ती होती महान।।१।।

कुरळे त्याचे केस, म्हणून बर्बरीक पडले नाव।
अजेय भगवान श्रीकृष्णाला ही, न टाळता आला घाव।।
बालपणी पासूनच मिळाले, शस्त्र विद्येचे प्रशिक्षण।
तेव्हाच करून पूर्ण, गेला घ्यायला अस्त्रांचे उच्च शिक्षण।।२।।

आजी त्याची हिडिंबा, मायावी फार।
लहानपणी मिळाला, महाविद्येचा सार।।
परंतु होती इच्छा, आणखी शिक्षण घेण्याची।
म्हणून केली जिद्द, विजय सिद्ध सेन सोबत जाण्याची।।३।।

करून कठोर तपश्चर्या कामाक्षेची, केली प्राप्त शक्ती महान।
परंतु प्राप्त करूनही महाशक्ती, वरदान वाटले फार लहान।।
न मानली हार कधी, केले शिव शक्तीला प्रसन्न।
प्राप्त करून बाण अमोघ, केली विद्या संपन्न।।४।।

केली विनंती जेव्हा गुरूंना, गुरू दक्षिणा घेण्याची।
घ्यावी लागली शपथ, सदा दुर्बलास साथ देण्याची।।
सामान्य बाबतीत होती, प्रतिज्ञा ही सदा उचित।
कुरुक्षेत्रात ठरली मात्र, अपवादात्मक पणे अनुचित।।५।।

करण्यासाठी परिक्षा, आले श्रीकृष्ण भगवान।
पराभव झाला त्यांचाही, इतकी शक्ती महान।।
बोलले द्वारकाधिश त्याला, प्रयोग तुझ्या विद्येचा करून दाखव काही।
दाखवता कळले हरीला, यापुढे कोणास आपणही तारु शकत नाही।।६।।

बोलले हरी भेदन्यास पर्ण, जे सर्व होते वृक्षावर।
ठेवून बान धनुष्यावर, लक्ष साधले वृक्षाच्या पर्णांवर ।।
तोडून पर्ण दाखवली लीला हरी ने, ठेवून पाय तोडलेल्या पर्णावर।
पर्ण सर्व छेदत गेला बाण अमोघ, घाव केला श्री हरी च्या चरणावर।।७।।

पाहून पराक्रम त्या बालकाचा, झाले माधव अचम्बित।
ऐकून गुरूदक्षिणेबाबत त्याचा, झाले केशव चिंतित।।
देऊन समज हरी ने, करवून दिले बालकास सत्याचे भान।
टाळण्यासाठी नरसंहार दिले, अल्प वयातच महाबलिदान।।८।।

केले मस्तक अर्पण, बर्बरीक ने चरणी शामाच्या।
स्थापन केले हरी ने, मस्तक स्थानी घटूशामाच्या।।
वीर महावीर बालक, भक्त ज्याचे घनश्याम।
बलिदान त्याचे महान, स्थान त्याचे घटुश्याम।।९।।

COMMENTS OF THE POEM

The Road Not Taken

BEST POEMS
BEST POETS
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success