करी पादक्रांत रुप तुझे मनोहर, जैसी निशा
नभात पसरली प्रभा, तारकांनी बहरली दिशा
...
हृदयी मर्म माझ्या, परिणयास न येणे कधी अडथळे ह्या एकरंग दांपत्यास
प्रेम हे नसते जेमतेम
...
हृदयी मर्म माझ्या, परिणयास न येणे कधी अडथळे ह्या एकरंग दांपत्यास
प्रेम हे नसते जेमतेम
...
Elysium descends down
exhilarates the spirit quiveringly
...
संभव मला आज रात्रमानी रचु शकतो व्याकुळ ओळी
दाखल्यासाठी, मांडु शकतो तृतीय प्रहरी ह्या तारका
...
नभात दाटून आला आहे भरगच्च पाऊस छटा जणू की गडद शाई.
सोंग करत लपण्याचं , सुप्त मनी ईहा घरुन करीत प्रार्थना अधिक पर्जन्यवृष्टी ची.
...
करु का तुझसी तुलना त्या उष्म प्रहरा संगे?
तु आहेस मनमोहीनी व
निर्मळ
...
पराजय, माझा पराजय
माझा एकांतवास आणि माझा अलिप्तवास
तु सखा माझा,
हजार जयोत्सवा पेक्षा प्रिय ,
...
माझी लाल, लालबुंद गुलाब तु
प्रिये! माझी लाल, लालबुंद गुलाब तु,
...
मंद वारा, संथ धारा
जणू ते जहाज उभं कसं
जसं परमपित्याचा नियम जणू काही
सांगाडा उभा धीर समुद्रावर
...
चला मैं मनचला
खुशनुमा और उमंगभरी दुनिया हैं
मिट्टी से लिपटी राह पर
मंजिल हैं वहाॅं जहाॅं मैं चलुं
...
A teacher and a traveller, who is always looking forward to the point where I can experience the kind of things that are otherwise not possible without the medium of arts and explore myself to understand what lies within me. I am on a journey to be a human being....)
करी पादक्रांत रुप तुझे मनोहर (She Walks In Beauty)
करी पादक्रांत रुप तुझे मनोहर, जैसी निशा
नभात पसरली प्रभा, तारकांनी बहरली दिशा
कांती तिची गहिरी, निर्मळ देई मनशांती
परिपूर्ण तिची परिभाषा, लोचने फुलवीत आशा
मखमाली आभा, पसरे इहलोकी हे तप्त
मंद प्रकाश विखरे स्वर्गलोकी हे पर्याप्त
छटा तिची अणुमात्र, घटा बहुतांश पात्र
अनामिके, अदा तुझी करी घायाळ दिनरात्र
कुंतल काक केशकाळा तरुवार
मनी जे मृदु वदन दिसे हळुवार
ध्यानी ते इंदु वसे शितिज पार
निष्कलंक अंतरंग वास्तव्यास शुद्धतेची धार
तुझे मधाळ हे गाल, भाळ हे अगम्य
बोलके डोळे, निश्चल ओष्ठ, मुख सौम्य तु रम्य
हास्य स्थल अंतर्वास, माया तुझी प्रतिछाया
दर्शवत तुझे दिनमान सुजनता पुर्ण अनुमान
चित्त तुझे अविचल हे माझं तर्जुमान
हृदयीं तुझ्या अनुप्रीती, निष्कलंक आहे माझी प्रिती
मुळ कवी: लॉर्ड बायरन /जॉर्ज गॉर्डन बायरन
रुपांतर: समीर खासनीस